लखनौच्या एकना स्टेडियमवर गुरुवारी (12 ऑक्टोबर) आयसीसी विश्वचषक 2023 च्या (ICC Cricket World Cup 2023) दहाव्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (AUS vs SA) यांच्यात सामना खेळवला गेला. या सामन्यात पॅट कमिन्सच्या संघाला 134 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 312 धावांचे लक्ष्य होते, परंतु कांगारू संघ 40.5 षटकांत केवळ 177 धावांवरच मर्यादित राहिला. तत्तपुर्वी, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकुन गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियासमोर 312 धावांचे लक्ष्य ठेवले होते. दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डी कॉकने 109 आणि एडन मार्करामने 56 धावांची खेळी केली. तर ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकण्यासाठी 50 षटकात 312 धावा बनव्याच्या होत्या परंतु कांगारू संघ 40.5 षटकांत केवळ 177 धावांवरच मर्यादित राहिला आणि पराभवाला सामोरे गेला.
Australia bowled out for 199 Vs India.
Australia bowled out for 177 Vs South Africa.
- The 5 times champions are struggling in the 2023 World Cup....!!! pic.twitter.com/7CtRStDB5N
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 12, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)