IND-W vs SA-W, 2nd T20I: भारतीय महिला क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघ यांच्यात आज तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. पहिल्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा 12 धावांनी पराभव केला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आता या सामन्यात टीम इंडिया मालिकेत बरोबरी करण्यासाठी मैदानात उतरली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. दरम्यान, टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 20 षटकांत 6 गडी गमावून 177 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेसाठी सलामीवीर तझमिन ब्रिट्सने 52 धावांची शानदार खेळी केली. टीम इंडियाकडून पूजा वस्त्राकर आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. टीम इंडियाला हा सामना जिंकण्यासाठी 20 षटकात 178 धावा करायच्या आहेत.
2ND WT20I. 19.6: Pooja Vastrakar to Annerie Dercksen 4 runs, South Africa (Women) 177/6 https://t.co/wykEMCz3xT #INDvSA @IDFCFIRSTBank
— BCCI Women (@BCCIWomen) July 7, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)