क्रिकेट दक्षिण आफ्रिका (CSA) ने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषक 2022 (T20 WorldCup 2022) साठी आपला संघ निवडला आहे. अव्वल फलंदाज रॅसी व्हॅन डर डुसेनला 15 जणांच्या संघात वगळण्यात आले आहे. संघाचे कर्णधारपद टेंबा बावुमाकडे सोपवण्यात आले आहे. हाच 15 सदस्यीय संघ या महिन्याच्या अखेरीस तीन सामन्यांच्या T20I मालिकेसाठी भारताचा दौरा करेल. दक्षिण आफ्रिकेसाठी चांगली बातमी अशी आहे की कर्णधार टेम्बा बावुमा सलग दुसऱ्या विश्वचषकासाठी तो दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे नेतृत्व करणार आहे. त्याचबरोबर रिले रुसोनेही दक्षिण आफ्रिकेच्या T20 संघात पुनरागमन केले आहे.

T20 विश्वचषक आणि भारत दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ: टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, हेन्रिक क्लासेन, रीझा हेंड्रिक्स, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्टजे, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरिअस, काउ प्रेटोरियस , रिले रोसोव, तबरेझ शम्सी.

राखीव खेळाडू: ब्योर्न फोर्टुइन, मार्को जेन्सन आणि अँडिले फेहलुकवायो.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)