IND vs SL 3rd ODI: टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना तिरुवनंतपुरममध्ये खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाची नजर क्लीन स्वीपकडे आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पहिले दोन सामने जिंकून मालिका जिंकली. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेमध्ये टीम इंडियामध्ये दोन मोठे बदल करण्यात आले आहेत. दरम्यान, टीम इंडियाची सुरुवात खूपच वेगवान झाली आहे. सलामीवीर शुभमन गिलने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील सहावे अर्धशतक पूर्ण केले आहे. शुभमन गिलचे श्रीलंकेविरुद्धचे हे दुसरे अर्धशतक आहे. सलामीवीर शुभमन गिल 52 चेंडूत 50 धावा केल्या तर विराट कोहली त्याच्यसोबत क्रिजवर आहे. टीम इंडियाची धावसंख्या 153/1

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)