PAK vs SL 1st Test 2023: पाकिस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने (Shaheen Afridi) गाॅल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या (PAK vs SL) पहिल्या दिवशी 100 कसोटी बळी पूर्ण करून महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. दुखापतीमुळे वर्षभराच्या विश्रांतीनंतर या फॉरमॅटमध्ये पुनरागमन करणाऱ्या आफ्रिदीने 26व्या कसोटी सामन्यात ही कामगिरी केली. त्याने सामन्याच्या तिसऱ्या चेंडूवर श्रीलंकेचा सलामीवीर निशान मदुष्काला बाद करून ही कामगिरी केली. या पराक्रमासह तो 100 कसोटी बळी घेणारा 18वा पाकिस्तानी गोलंदाज ठरला. उल्लेखनीय म्हणजे, वयाच्या 23 व्या वर्षी ही कामगिरी करणारा आफ्रिदी हा तिसरा पाकिस्तानी वेगवान गोलंदाज आहे, त्याने दिग्गज वसीम अक्रम आणि वकार युनूस यांच्या पंक्तीत सामील झाला आहे.
Stuck on 99 wickets for a year. Returns to Sri Lanka to bag the 100th wicket milestone. @iShaheenAfridi 👏#SLvPAKonFanCode #SLvPAK #PAKvSL pic.twitter.com/W7ydbcvo9l
— FanCode (@FanCode) July 16, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)