Abu Dhabi Knight Riders: शाहरुख खानच्या नाईट रायडर्सने UAE च्या नवीन T20 लीगमध्ये अबू धाबी संघाचा ताबा घेतला

नाइट रायडर्स हा आगामी UAE टी-20 लीगमध्ये फ्रँचायझी घेणारा पाचवा भारतीय ग्रुप बनला आहे. शाहरुख खानच्या सह-मालकीच्या गटाची ही T20 लीगमधील चौथी फ्रँचायझी देखील आहे. अबू धाबी नाइट रायडर्स नावाचा हा संघ UAE T20 लीगचा अविभाज्य भाग असेल, ज्याला अमिराती क्रिकेट बोर्डाचा परवाना आहे.

Abu Dhabi Knight Riders: शाहरुख खानच्या नाईट रायडर्सने UAE च्या नवीन T20 लीगमध्ये अबू धाबी संघाचा ताबा घेतला
अबू धाबी क्रिकेट स्टेडियम (Photo Credits: Twitter/KKRiders)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मधील कोलकाता नाईट रायडर्स फ्रँचायझीचा मालक असलेला नाइट रायडर्स ग्रुप (Knight Riders Group) वेगाने आपले पंख पसरवत आहे. शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) सह-मालकीच्या गटाने चौथी T20 लीग फ्रँचायझी घेतली आहे जी आगामी UAE T20 लीगमध्ये अबू धाबीवर (Abu Dhabi) आधारित असेल.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 12, 2022 03:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).