MI vs DC: महिला प्रीमियर लीग 2024 च्या 12 व्या सामन्यात (WPL 2024) दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा 29 धावांनी (MI vs DC) पराभव केला. या सामन्यात मोठा विक्रम घडला. मुंबई इंडियन्सची वेगवान गोलंदाज शबनीम इस्माईलने (Shabnim Ismail) अतिशय वेगवान गोलंदाजी केली. यादरम्यान तिने इतका वेगवान चेंडू टाकला की तो आता महिला क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू ठरला आहे. शबनिम इस्माईलने दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंगविरुद्ध सामन्यात ताशी 132.1 किमी वेगाने चेंडू टाकला. आता शबनीम इस्माईल ही महिला क्रिकेटच्या इतिहासात ताशी 130 किमीचा वेग पार करणारी पहिली महिला गोलंदाज ठरली आहे. शबनीम इस्माईलचा हा चेंडू मेग लॅनिंगला समजला नाही आणि तो चेंडू लॅनिंगच्या पॅडवर लागला. (हे देखील वाचा: MS Dhoni Post: IPL सुरू होण्याआधीचं धोनीने केलेल्या पोस्टमुळे चाहते चिंतेत, नव्या सीझनमध्ये साकारणार भूमिका?)
Mumbai Indians fast bowler Shabnim Ismail bowled the Fastest Delivery by a Women's Cricket - 132.1 KMPH 👏 #MIvDC #WPL2024 #DCvMI pic.twitter.com/srOZimZ0HQ
— Richard Kettleborough (@RichKettle07) March 5, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)