IND vs ENG 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना (IND vs ENG 5th Test) गुरुवारपासून खेळवला जात आहे. धर्मशाळा (Dharmashala) येथील एचपीसीए स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. टीम इंडिया सध्या मालिकेत 3-1 ने आघाडीवर आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ सकाळी 9.30 वाजता सुरू होईल. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि पहिल्या डावात 218 धावा केल्या. प्रत्युत्तरात फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 1 गडी गमावून 135 धावा केल्या होत्या. दरम्यान, भारतातील क्रिकेट चाहते स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर भारत विरुद्ध इंग्लंड पाचवा कसोटी सामना पाहू शकतात. हा सामना जियो सिनेमा ॲपवर विनामूल्य स्ट्रीम केला जाईल. (हे देखील वाचा: R Ashwin And Kuldeep Yadav Viral Video: बेसबॉलचा बँड वाजवल्यानंतर अश्विन आणि कुलदीपमध्ये झाली तू तू मै मै, व्हिडिओ पाहून तुम्हालाही येइल हसू Watch)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)