IND vs ENG 1st Test: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात हैदराबाद येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. इंग्लंडचा पहिला डाव 246 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात भारताने पहिल्या डावात सात विकेट गमावत 421 धावा केल्या आहेत. सध्या टीम इंडियाकडे इंग्लंडवर 175 धावांची आघाडी आहे. रवींद्र जडेजा 81 धावांवर नाबाद असून अक्षर पटेल 35 धावांवर नाबाद आहे. तत्पूर्वी, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लंडचा संपूर्ण संघ 64.3 षटकांत केवळ 246 धावा करू शकला नाही. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने सर्वाधिक 70 धावा केल्या. टीम इंडियाकडून रवींद्र जडेजा आणि आर अश्विनने प्रत्येकी सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.
Stumps on Day 2 in Hyderabad! 🏟️#TeamIndia move to 421/7, lead by 175 runs 🙌
See you tomorrow for Day 3 action 👋
Scorecard ▶️ https://t.co/HGTxXf8b1E#INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/sul21QNVgh
— BCCI (@BCCI) January 26, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)