Devdutt Padikkal Out: आयपीएल 2024 चा (IPL 2024) चौथा सामना राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स (RR vs LSG) यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला जात आहे. दोन्ही संघ आपला सलामीचा सामन्याने चांगली सुरुवात करून जिंकण्याचा प्रयत्न करतील. दोन्ही संघांमधील हेड-टू-हेडची आकडेवारी पाहिली तर राजस्थान रॉयल्सचा वरचष्मा दिसतो. दरम्यान, राजस्थानने टाॅस जिंकून प्रथम फलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना राजस्थानने लखनौसमोर 194 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. राजस्थानसाठी कर्णधार संजू सॅमसनने शानदार फलंदाजी करत 82 धावांची नाबाद खेळी केली. लखनौकडून नवीन-उल-हकने सर्वाधिक दोन बळी घेतले. लखनौ संघाला हा सामना जिंकण्यासाठी 20 षटकात 194 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या लखनौला दुसरा धक्का लागला आहे. लखनौचा स्कोर 10/2
Match 4. WICKET! 2.2: Devdutt Padikkal 0(3) b Trent Boult, Lucknow Super Giants 10/2 https://t.co/MBxM7IwmBG #TATAIPL #IPL2024 #RRvLSG
— IndianPremierLeague (@IPL) March 24, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)