IND vs ENG 4th Test Day 2: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या सामन्याला (IND vs ENG 4th Test) शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. हा सामना रांचीमध्ये खेळवला जात आहे आहे. भारतीय संघ मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून अजेय आघाडी मिळवायची आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने 7 गडी बाद 302 धावा केल्या होत्या. तसेच, दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. प्रथम फलंदांजी इंग्लंडचा पहिला डाव 353 धावांवर आटोपला आहे. इंग्लंडकडून जो रुटने 122 धावा केल्या आहे तर भारताकडून जडेजाने 4 आणि आकाश दीपने 3 विकेट घेतल्या आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आकाश दीपने रांची कसोटीतून भारतासाठी पदार्पण केले. दरम्यान, पहिल्या डावात भारताची सुरुवात खराब झाली आहे. शुभमन गिल 38 धावा करुन बाद झाला आहे. भारताचा स्कोर 86/2
4TH Test. WICKET! 24.1: Shubman Gill 38(65) lbw Shoaib Bashir, India 86/2 https://t.co/3ZdkXkSonb #INDvENG @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) February 24, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)