IND vs ENG 2nd Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणमच्या विझाग स्टेडियमवर खेळला (IND vs ENG 2nd Test) जात आहे. या सामन्याबाबत टीम इंडियामध्ये तीन बदल पाहायला मिळाले आहेत. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजलाही दुसऱ्या कसोटी सामन्यातून वगळण्यात आले आहे. मोहम्मद सिराजच्या जागी मुकेश कुमारचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. याशिवाय कुलदीप यादव आणि रजत पाटीदार यांचाही प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. या सामन्यात रजत पाटीदारने भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. या सामन्यापूर्वी चाहत्यांना वाटत होते की, विशाखापट्टणम कसोटीत सरफराज खानला पदार्पणाची संधी मिळेल पण त्याच्या जागी रजत पाटीदारला ही संधी मिळाली. त्यानंतर आता सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. सरफराज खानला पदार्पणाची संधी न मिळाल्याने चाहते नाराज असल्याचे दिसत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)