IND vs ENG 5th Test: गुरुवारपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी (IND vs ENG 5th Test) मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना खेळवला जात आहे. धर्मशाळा (Dharmashala) येथील एचपीसीए स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. टीम इंडिया सध्या मालिकेत 3-1 ने आघाडीवर आहे. दरम्यान, दुसऱ्या दिवसाच्या खेळ सुरु आहे. पहिल्या डावात फलंदांजीला आलेल्या भारतीय संघातील फलंदांज सरफराज खानने अर्धशतक झळकावले आहे. भारताचा स्कोर 366/3. तत्पुर्वी, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचवेळी देवदत्त पडिक्कल भारतासाठी पदार्पण केले आहे. त्याचबरोबर रविचंद्रन अश्विनचा हा 100 वा सामना आहे. तसेच, प्रथम फलंदांजी करताना इंग्लंड पहिल्या दिवशी 218 धावावर ऑलआउट झाला. भारतीय फिरकीपटूने कहर करत एकाही इंग्रज फलंदांजाला टिकू दिले नाही. भारताकडून कुलदीपने 5 तर अश्विनने चार आणि जडेजाने 1 विकेट घेतली. तर इंग्लंडकडून झॅक क्रॉलीने सर्वाधिक 79 धावा केल्या.
Zooms past a fifty! 👌 👌
Sarfaraz Khan brings up his 3⃣rd Test half-century 👏 👏
Follow the match ▶️ https://t.co/jnMticF6fc #TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/QvxllLAN82
— BCCI (@BCCI) March 8, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)