भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सुपर फोर सामन्यात पावसाने व्यत्यय आणला आहे. रविवारी खेळ पूर्ण होऊ शकला नाही म्हणुन आज हा संपुर्ण सामना खेळवण्यात येत आहे.  दरम्यान, प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने पाकिस्तान समोर 357 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. दरम्यान, रविंद्र जाडेजाचा चेंडू स्विप करण्याच्या प्रयत्नात सलामान आगा जखमी झाला. त्याच्या डोळ्याजवळ इजा झाली. चेंडू लागला तेथून रक्तही आले. मैदानावर फिजिओ दाखल झाले आणि सामना काहीवेळासाठी थांबवण्यात आला होता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)