RR vs SRH IPL 2021 Match 27: दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर सुरु असलेल्या आयपीएलच्या (IPL) 27व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) सलामी फलंदाज जोस बटलरच्या शतकी खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध (Sunrisers Hyderabad) 20 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून 220 धावांचा डोंगर उभारला आणि केन विल्यमसनच्या ‘ऑरेंज आर्मी’ला विजयासाठी 221 धावांचे विशाल टार्गेट दिलं आहे. बटलरने सर्वाधिक 124 धावांची खेळी केली यामध्ये त्यांनी 11 चौकार आणि 8 षटकार खेचले. कर्णधार संजू सॅमसनने (Sanju Samson) 48 धावांची खेळी केली. रियान पराग 15 धावा आणि डेविड मिलर 7 धावा करून नाबाद परतले. दुसरीकडे, हैदराबादचे गोलंदाजांनी आज निराशाजनक कामगिरी केली. संदीप शर्मा, राशिद खान (Rashid Khan) व विजय शंकरने प्रत्येकी 1 विकेट काढली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)