वर्ल्ड कप 2023 चा 21 वा सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडने 50 षटकात 10 गडी गमावून 270 धावा केल्या. प्रत्युत्तरात या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय क्रिकेट संघाची सुरुवात चांगली झाली आणि रोहित शर्माने (Rohit Sharma) या सामन्यात विशेष कामगिरी केली. रोहित शर्मा पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. यामुळेच जगभरात त्याच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. रोहितने न्यूझीलंडविरुद्ध दोन षटकार मारताच, 2023 साली एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा तो पहिला भारतीय ठरला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)