नुकत्याच झालेल्या आशिया कप 2022 मध्ये टीम इंडियामध्ये वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah) कमतरता होती, तर दुखापतीमुळे हा खेळाडू ही स्पर्धा खेळू शकला नाही. पण आता बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून तो टीम इंडियात (Team India) परतला असला तरी त्याच्या पुनरागमनामागे भारताचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) आपली प्रतिक्रिया दिली आहे. रोहित म्हणाला, बुमराह आमच्यासाठी म्हत्वाचा खेळाडू आहे. इतक्या वर्ष त्याने आपल्या टीमसाठी चांगली कामगीरी केली आहे आणि तो एक घातक गोलंदाज आहे. त्यामुळे तो टीम इंडियामध्ये असणं हे आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील पहिला सामना 20 सप्टेंबर रोजी मोहाली (Mohali) येथे होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Team India (@indiancricketteam)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)