Australian Men's Cricket Team vs India National Cricket Team: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना मेलबर्नमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत आहे. फलंदाजीत ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली आहे. दुसरीकडे टीम इंडियाच्या क्षेत्ररक्षणादरम्यान कर्णधार रोहित शर्मा सहकारी खेळाडू यशस्वी जैस्वालवर ओरडताना दिसला. यावेळी स्टंप माईकमध्ये रोहितचा आवाजही कैद झाला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. वास्तविक, जेव्हा स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लॅबुशेन फलंदाजी करत होते, तेव्हा रोहितने जैस्वालला फलंदाजीच्या अगदी जवळ मैदानात उभे केले. ज्यानंतर जैस्वाल हा चेंडू त्याच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच हवेत उडी मारताना दिसल्याने रोहित शर्मा चिडला. रोहित जैस्वालला म्हणाला, “अरे जस्सू, तू स्ट्रीट क्रिकेट खेळतोस का? जोपर्यंत फलंदाज खेळत नाही तोपर्यंत उठू नको." रोहितचा हा आवाज स्टंप माईकमध्ये कैद झाला होता.
Stump Mic Gold ft. THE BEST, @ImRo45! 🎙️😂
The Indian skipper never fails to entertain when he’s near the mic! 😁#AUSvINDOnStar 👉 4th Test, Day 1 LIVE NOW pic.twitter.com/1fnc6X054a
— Star Sports (@StarSportsIndia) December 26, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)