IND vs BAN T20 WC 2024 Super 8: भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यात आज टी-20 विश्वचषक (T20 World Cup 2024) स्पर्धेतील 47 वा सामना अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर खेळवला जात आहे. दोन्ही संघांमधील सुपर-8 मधील हा सातवा सामना आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने अफगाणिस्तानचा पराभव केला आहे. तर बांगलादेशला ऑस्ट्रेलियाकडू पराभव स्वीकारावा लागला आहे. दरम्यान, बांगलादेशचा कर्णधार नझमुल हुसेन शांतोने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाला चौथा मोठा झटका बसला. ऋषभ पंत 36 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. टीम इंडियाचा स्कोर 108/4.
WT20 2024. WICKET! 11.4: Rishabh Pant 36(24) ct Tanzim Hasan Sakib b Rishad Hossain, India 108/4 https://t.co/UDl6GDmecg #T20WorldCup #INDvBAN
— BCCI (@BCCI) June 22, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)