Rishabh Pant Knee Surgery: भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) 30 डिसेंबर 2022 रोजी सकाळी एका भीषण रस्ता अपघाताला बळी पडला. या अपघातानंतर त्यांच्या गुडघ्याला, डोक्याला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली होती. दिल्ली-डेहराडून रोडवरील सक्षम रुग्णालयात उपचारानंतर पंतला डेहराडून मॅक्समध्ये हलवण्यात आले. येथे तो 4 जानेवारी 2023 पर्यंत राहिला आणि त्यानंतर त्याला विमानाने मुंबईला नेण्यात आले जिथे शनिवारी 7 जानेवारी रोजी त्यांच्या गुडघ्याचे ऑपरेशन पूर्ण (Rishabh Pant Knee Surgery) झाल्याची माहिती समोर आली. एनआय कडून मिळालेल्या माहितीनुसार, ऋषभ पंतच्या गुडघ्याचे ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. मात्र, त्याला वैद्यकीय पथकाच्या निरिक्षणाखाली ठेवण्यात आले असून त्याची प्रकृती वेगाने बरी होत आहे. 4 जानेवारीला बीसीसीआयकडून माहिती देण्यात आली होती की पंत यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात एअरलिफ्ट करण्यात आले आहे.
Tweet
Cricketer Rishabh Pant's knee surgery was successfully conducted yesterday at a private hospital in Mumbai. He is under the supervision of the medical team and is recovering fast: Sources
(File pic) pic.twitter.com/wtEmsTbqQE
— ANI (@ANI) January 7, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)