IPL 2025: आजपासून आयपीएल 2025 ला सुरूवात झाली आहे. यावेळी लीगचा पहिला सामना केकेआर आणि आरसीबी यांच्यात खेळला जात आहे. या सामन्याच्या सुरुवातीपूर्वी उद्घाटन समारंभ पार पडला. यावेळी दिशा पटानी आणि करण औजला आणि श्रेया घोषाल यांनी परफॉर्म केले. दरम्यान, या काळात रिंकू सिंग त्याच्या एका कृतीमुळे नेटकऱ्यांच्या नजेरेत आला आहे. आयपीएलच्या उद्घाटन समारंभात शाहरुख खानने आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीला स्टेजवर बोलावले. मात्र, जेव्हा रिंकू सिंग स्टेजवर येत होता, तेव्हा त्याने विराट कोहलीकडे दुर्लक्ष केले आणि हस्तांदोलन न करता पुढे गेला. हे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले. तथापि, हे जाणूनबुजून घडले की केवळ योगायोग होता याबद्दल कोणतेही अधिकृत विधान नाही.
Kohli Ko Ignore Krdiya Rinku Singh Nei #KKRvsRCB #JioHotstar #ViratKohli𓃵 #rinkusingh pic.twitter.com/FjwQo3ZjoU
— Ankit Khola (@AnkitKhola03) March 22, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)