रियान परागच्या झंझावाती अर्धशतकानंतर गोलंदाजांनी केलेल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 29 धावांनी पराभव केला. आयपीएल 2022 (IPL) मधील राजस्थानचा हा सहावा विजय आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान संघ आठ सामन्यांत 12 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. यासह रॉयल चॅलेंजर्सचा नऊ सामन्यांमधील हा सहावा पराभव आहे.

राजस्थानने दिलेल्या 145 धावांच्या लक्ष्य गाठताना आरसीबी संघ 19.3 षटकांत केवळ 115 धावाच करू शकला. त्याच्याकडून कर्णधार फाफ डू प्लेसिसने सर्वाधिक 23 धावा केल्या. विराट कोहलीला सलामीला पाठवण्याचा आरसीबीचा निर्णय योग्य ठरला नाही. कोहली 9 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

 

View this post on Instagram

 

A post shared by IPL (@iplt20)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)