IND vs AUS 1st Test: टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2023 चा हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झाला आहे. चार सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जात आहे. या ट्रॉफीचा हा 16वा हंगाम 10व्यांदा भारतीय भूमीवर खेळला जात आहे. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. विकेटकीपर फलंदाज केएस भरत आणि सूर्यकुमार यादव टीम इंडियासाठी पदार्पण कसोटी सामने खेळत आहेत. तिसरी विकेट घेत रवींद्र जडेजाने ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्का दिला. जडेजाने (Ravindra Jadeja) 37 (107 चेंडू) धावांवर संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू स्टीव्ह स्मिथला क्लीन बोल्ड केले. ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ 109 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला.

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)