IND vs ENG 3rd Test: भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना (IND vs ENG 3rd Test) आजपासून राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर खेळवला जात आहे. या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता दिसली असून तिसऱ्या कसोटी सामन्यातही या सामन्याची अपेक्षा आहे. तत्तपुर्वी, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सरफराज आणि ध्रुव जुरेल आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे. दरम्यान, रवींद्र जडेजानेही तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी शतक पूर्ण केले आहे. कठीण परिस्थितीत फलंदाजीसाठी आलेल्या रवींद्र जडेजाने कर्णधार रोहित शर्मासह प्रथम भारतीय डावाची धुरा सांभाळली. त्यानंतर जडेजाने कसोटी कारकिर्दीतील चौथे शतक झळकावले.
Test Hundred on his home ground!
A hard fought 4th Test ton and second in Rajkot from @imjadeja 👏 👏#INDvENG @IDFCFIRSTBank pic.twitter.com/osxLb6gitm
— BCCI (@BCCI) February 15, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)