Ravindra Jadeja Retirement: टी-20 विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना शनिवारी भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करत दुसऱ्यांदा आयसीसी टी-20 विश्वचषकावर कब्जा केला आहे. टीम इंडियाने या विश्वचषकात चमकदार कामगिरी केली आणि संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिली. यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहली यांनी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. आता या दोघांनंतर संघाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजानेही आंतरराष्ट्रीय टी-20 फॉरमॅटला अलविदा केला आहे. रवींद्र जडेजाच्या या निर्णयानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रवींद्र जडेजाच्या निवृत्तीवर पोस्ट टाकली आहे. या पोस्टमध्ये पीएम मोदींनी रवींद्र जडेजाचे खूप कौतुक केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून म्हटले की, "प्रिय रवींद्र जडेजा, तुम्ही अष्टपैलू म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. क्रिकेटप्रेमी तुमच्या स्टायलिश स्ट्रोक खेळाचे, फिरकीचे आणि चमकदार क्षेत्ररक्षणाचे कौतुक करतात. गेल्या अनेक वर्षांतील तुमच्या उत्कृष्ट टी-20 कामगिरीबद्दल धन्यवाद. तुमच्या पुढील वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा."

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)