आयसीसी विश्वचषक 2023 च्या पहिल्या उपांत्य फेरीत भारताने न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव केला. या विजयासह भारतीय संघाने आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. जो अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 4 गडी गमावून 397 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात किवी संघ 327 धावांत गडगडला. या सामन्यात मोहम्मद शमीने 9.5 षटकात 57 धावा देत 7 बळी घेतले. मोहम्मद शमीला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. विश्वचषकात 4 वेळा 5 बळी घेणारा शमी पहिला गोलंदाज ठरला आहे. दरम्यान, सामन्यानंतरचा एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रवी अश्विन शमीच्या हाताला किस करत आहे. हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)