Ram Siya Ram Song Played In South Africa: टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना बोलंड पार्क, पार्ल येथे खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 78 धावांनी पराभव करत मालिका 2-1 ने जिंकली. तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणफेक  जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाने निर्धारित 50 षटकांत आठ गडी गमावून 296 धावा केल्या. दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये केशव महाराज बोलंड पार्कवर बॅटिंगसाठी येताच स्टेडियममध्ये 'राम सिया राम'ची गाणी वाजू लागली. विकेटकीपर आणि भारतीय कर्णधार केएल राहुलने त्याला विचारले, "केशव भाई, तुम्ही जेव्हाही येता तेव्हा हे गाणे वाजवतो."

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)