इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या मोसमातील 52 वा सामना आज राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना राजस्थानमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा 18 वा सामना आहे. याआधी झालेल्या 17 सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी जवळपास बरोबरीने विजय आणि पराभव पत्करला आहे. राजस्थान रॉयल्सने 9 सामने जिंकले असून सनरायझर्स हैदराबादने 8 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांची अलीकडची कामगिरीही सारखीच दिसते. या संघांनी या हंगामातील त्यांच्या शेवटच्या 5 सामन्यांपैकी 4-4 सामने गमावले आहेत. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
राजस्थान रॉयल्स : यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकीपर), जो रूट, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, मुरुगन अश्विन, संदीप शर्मा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल
सनरायझर्स हैदराबाद : अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, अब्दुल समद, मार्को जॅनसेन, विव्रत शर्मा, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन
🚨 Toss Update from Jaipur 🚨@rajasthanroyals elected to bat against @SunRisers!
Follow the match 👉 https://t.co/1EMWKvcgh9#TATAIPL | #RRvSRH pic.twitter.com/JrNKjpDPKi
— IndianPremierLeague (@IPL) May 7, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)