RR vs GT IPL 2025 47th Match: आयपीएल 2025 चा 47 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स (RR vs GT) यांच्यात सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात राजस्थानने गुजरातचा 8 गडी राखून पराभव केला आहे. या सामन्यात 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने (vaibhav Suryavanshi) फक्त 35 चेंडूत शतक झळकावले आणि आयपीएलमध्ये इतिहास रचला. वैभवच्या खेळीचा उत्साह इतका होता की आतापर्यंत व्हीलचेअरवर बसलेला राजस्थानचा प्रशिक्षक राहुल द्रविडही (Rahul Dravid) उभा राहिला. त्याने दोन्ही हात वर करून वैभवचे मनोबल वाढवले. आयपीएलपूर्वी राहुलच्या पायाला दुखापत झाली होती, ज्यामुळे तो संपूर्ण आयपीएलमध्ये व्हीलचेअरवर दिसला. पण वैभवची खेळी पाहिल्यानंतर तो सगळं विसरून आनंदाने उड्या मारू लागला. मात्र, आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)