Punjab Kings vs Kolkata Knight Riders: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 31 वा सामना आज  पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात (PBKS vs KKR) यांच्यात महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुल्लानपूर, चंदीगड येथे खेळवला जाणार आहे. या हंगामात, पंजाब किंग्जचे नेतृत्व श्रेयस अय्यर करत आहे. तर, कोलकाता नाईट रायडर्सची कमान अंजिक्य राहणेच्या खांद्यावर आहे. या हंगामात दोन्ही संघाची कामगिरी समिश्र राहिली आहे. पॉइंट टेबलमध्ये कोलकाता पाचव्या तर पंजाब सहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे दोन्ही संघामध्ये आजचा सामना रोमांचक पाहायला मिळू शकतो. दरम्यान, पंजाबने नाणेफे जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (वकेटकीपर), सुनील नरेन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, हर्षित राणा, वैभव अरोरा, एनरिक नॉर्टजे, वरुण चक्रवर्ती

पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, जोश इंग्लिस, शशांक सिंग, ग्लेन मॅक्सवेल, मार्को जॅन्सन, झेवियर बार्टलेट, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)