इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामातील 64वा सामना आज पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स (PBKS vs DC) यांच्यात खेळला जात आहे. पंजाबमधील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जात आहे. प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी पंजाब किंग्जसाठी हा सामना जिंकणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, दिल्ली कॅपिटल्स संघासाठी हा सामना केवळ औपचारिकता आहे. पंजाब किंग्जला अंतिम चारमध्ये आपले स्थान निश्चित करायचे असेल, तर त्यांना त्यांचे उर्वरित सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील, जे त्यांना शक्य होणार नाही. पंजाब किंग्जचा संघ 12 गुणांसह गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर आहे. तर दिल्ली कॅपिटल्स संघ 8 गुणांसह दहाव्या स्थानावर आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दोन्ही संघाची प्लेइंग 11

पंजाब किंग्ज : शिखर धवन (कर्णधार), अथर्व तायडे, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम करण, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, कागिसो रबाडा, नॅथन एलिस, अर्शदीप सिंग.

पर्याय: प्रभसिमरन सिंग, सिकंदर रझा, मॅथ्यू शॉर्ट, ऋषी धवन, मोहित राठी.

दिल्ली कॅपिटल्स : डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), रिले रुसो, अक्षर पटेल, अमन हकीम खान, यश धुल, कुलदीप यादव, एनरिच नॉर्टजे, इशांत शर्मा, खलील अहमद.

पर्यायः मुकेश कुमार, अभिषेक पोरेल, रिपल पटेल, प्रवीण दुबे, सर्फराज खान

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)