आज इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामातील 18वा सामना पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जात आहे. हा सामना मोहालीच्या पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर खेळला जात आहे.या मोसमात दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी तीन सामने खेळले आहेत. त्यांना दोन सामन्यात विजय आणि एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान, गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्ज संघाने निर्धारित 20 षटकांत आठ गडी गमावून 153 धावा केल्या. पंजाब किंग्जकडून मॅथ्यू शॉर्टने सर्वाधिक 36 धावा केल्या आहेत. गुजरात टायटन्सकडून मोहित शर्माने सर्वाधिक दोन बळी घेतले. गुजरात टायटन्सला विजयासाठी 20 षटकात 154 धावा करायच्या आहेत.
Match 18. WICKET! 19.4: Shahrukh Khan 22(9) Run Out David Miller, Punjab Kings 152/7 https://t.co/qDQuP8ecgd #TATAIPL #PBKSvGT #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 13, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)