Prithvi Shaw Triple Century In Ranji Trophy: सध्या भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठ्या प्रथम श्रेणी रणजी ट्रॉफीचा 2022-23 हंगाम (Ranji Trophy 2022-23) सुरू आहे. यामध्ये टीम इंडियातून सातत्याने धाव घेत असलेल्या पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) पुन्हा आपल्या बॅटने सडेतोड उत्तर दिले आहे. शॉला बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियात (Team India) एंट्री मिळत नाहीये. याशिवाय तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये सतत धावा करत आहे. या दरम्यान, पृथ्वी शॉने आता आसामविरुद्ध रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईसाठी 41 चौकार आणि 2 षटकारांसह त्रिशतक झळकावले आहे. जे त्याचे देशांतर्गत क्रिकेट कारकिर्दीतील पहिले त्रिशतक आहे. यासह त्यांनी अनोखा इतिहास रचला आहे. जे भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याही फलंदाजाला करता आलेले नाही.
Prithvi Shaw Finally got out at 379. Still feel he’s the best to open in T20s for India
— Vikrant Gupta (@vikrantgupta73) January 11, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)