भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना इंदूरमध्ये खेळला जात आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताचा पहिला डाव 109 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 197 धावांवर आटोपला. भारताने दुसऱ्या डावात 163 धावा केल्या असून ऑस्ट्रेलियासमोर 76 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दरम्यान, तिसऱ्या दिवसाच्या खेळाला थोड्यावेळात सुरुवात होईल. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या अनेक चॅनेलवर पाहता येईल. याशिवाय डीडी स्पोर्ट्सवरही या सामन्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे. हॉटस्टारचे सदस्यत्व असलेले वापरकर्ते ऑनलाइन स्ट्रीमिंगद्वारे सामन्याचा आनंद घेऊ शकतात.
.@DeepDasgupta7 talks about the positives #TeamIndia can take away & stellar performances from Day 2. 👌
Will 🇮🇳 do the unthinkable?
Tune-in to #Mastercard #CricketLive
Today | 9:00 AM onwards | Star Sports & Disney+Hotstar#INDvAUS #BelieveInBlue #TestByFire #Cricket pic.twitter.com/EpA2xb8sng
— Star Sports (@StarSportsIndia) March 3, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)