आशिया कप 2022 (Asia Cup 2022) च्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने (SL) पाकिस्तानचा 23 धावांनी पराभव केला. यासह श्रीलंका संघ सहाव्यांदा चॅम्पियन बनला, तर पाकिस्तानचे तिसऱ्यांदा चॅम्पियन होण्याचे स्वप्न भंगले. तसेच, पाकिस्तानच्या चाहत्यांना हा पराभव पचवता आलेला नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा (Rameez Raja) हे देखील त्यापैकी एक आहेत. पाकिस्तानच्या पराभवानंतर जेव्हा एका भारतीय पत्रकाराने रमीज राजा यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते संतापले. त्यांनी पत्रकाराचा फोन हिसकावून घेतला. भारतीय पत्रकाराने रमीझला सांगितले की, लोक खूप दुखी आहेत. हे ऐकून रमीझ राजा संतापला. ते म्हणाले की तुम्ही जर भारताचे असाल तर तुमच्या लोकांना खूप आनंद होईल. आपण असे विचारू शकत नाही. असे म्हणत त्याने फोन हिसकावून खाली ठेवला.
पहा व्हिडिओ
Ramiz Raja is rattled!
Journalist: Pakistan fans are unhappy.
Ramiz: You are from India? you must are happy
*Angrily Snatched mobile from him*
Then walk away, stop to talk to another.. tells his companion to remove hand from his shoulder & move aside.pic.twitter.com/YB057mOo0w
— Jeev (@CricketJeevi) September 11, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)