आयसीसी विश्वचषक 2023 च्या 18 व्या (ICC Cricket World Cup 2023) सामन्यात शुक्रवारी (20 ऑक्टोबर) बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान (AUS vs PAK) याच्यात सामना खेळवला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला पराभूत करुन 62 धावांनी मात दिली आहे. तत्तपुर्वी, पाकिस्तानने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानसमोर 368 धावांचे लक्ष्य ठेवले. ऑस्ट्रेलियाकडून डेविड वार्नर 163 आणि मिचेल मार्श 121 सर्वाधिक धावा केल्या. तर पाकिस्तानकडून शाहिन आफ्रिदी 4 आणि हरिस रौफने 3 विकेट घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या फलंदाजांनी कांगारु गोलंदाजी समोर गुडघे टेकले आणि 45.3 षटकात सर्वबाद झाले. ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झाम्पा 4 तर मार्कस स्टॉइनिसन 2 विकेट घेतल्या. पाकिस्तानकडून अब्दुल्ला शफीक 64 आणि इमाम-उल-हक 70 सर्वाधिक धावा केल्या.
AUSTRALIA HAVE DEFEATED PAKISTAN BY 62 RUNS...!!! pic.twitter.com/VIRFau46AT
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 20, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)