IND-W vs PAK-W, Asia Cup 2024: महिला आशिया चषक 2024 आजपासून (Women's Asia Cup 2024) सुरू झाला आहे. आशिया चषकाचा दुसरा सामना भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND vs PAK) यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना डंबुला येथील रंगिरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. आशिया कपमध्येही टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्ध सहापैकी पाच सामने जिंकले आहेत. मात्र, गेल्या आशिया चषकातही टीम इंडियाला पाकिस्तानविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. दरम्यान, पाकिस्तानची कर्णधार निदा दार हिने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारत-पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन -

भारत: स्मृती मानधना, शफाली वर्मा, दयालन हेमलता, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, श्रेयंका पाटील, रेणुका ठाकूर सिंग.

पाकिस्तानः सिद्रा अमीन, गुल फिरोझा, मुनिबा अली (विकेटकीपर), निदा दार (कर्णधार), आलिया रियाझ, इरम जावेद, फातिमा सना, तुबा हसन, सादिया इक्बाल, नशरा संधू, सय्यदा अरुब शाह.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)