Emerging Asia Cup Final 2023: पुरुषांच्या इमर्जिंग आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत अ संघाचा पाकिस्तान अ संघाशी सामना होत आहे. गट फेरीत पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर भारतीय संघाला अंतिम फेरीत पुन्हा कट्टर प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सॅम अयुबनंतर शाहिबजादा फरहाननेही याच षटकात अर्धशतक पूर्ण केले आहे. त्याने 50 चेंडूत चार चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 50 धावा केल्या आहेत. पाकिस्तानच्या दोन्ही सलामीवीरांनी अर्धशतके पूर्ण करून शतकी सलामी दिली. या दोघांच्या उत्कृष्ट भागीदारीने पाकिस्तानसाठी मोठ्या धावसंख्येचा पाया रचला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)