IND vs ENG 3rd Test Day 3: टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील तिसरी कसोटी (IND vs ENG 3rd Test) राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर खेळली जात आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरूच आहे. राजकोटमध्ये खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाचे खेळाडू हातात काळ्या पट्ट्या बांधून मैदानात उतरले. नुकताच जगाचा निरोप घेतलेल्या टीम इंडियाचे माजी कर्णधार दत्ताजीराव गायकवाड यांच्या स्मरणार्थ हे करण्यात आल्याचे बीसीसीआयने (BCCI) म्हटले आहे. टीम इंडियाचे सर्वात वयोवृद्ध क्रिकेटपटू होण्याचा विक्रमही दत्ताजीराव गायकवाड यांच्या नावावर होता. 13 फेब्रुवारी रोजी माजी कर्णधाराचे निधन झाले. (हे देखील वाचा: Indian Cricket: महिला संघाच्या प्रशिक्षकाला बसमध्ये मद्यप्राशन केल्याप्रकरणी दंड, हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने केले निलंबित)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)