NZ vs SA 2nd Test: न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ संपला असून पाहुण्या दक्षिण आफ्रिकेने (South Africa) संपूर्ण नियंत्रण मिळवले आहे. दक्षिण आफ्रिकेने आपला दुसरा डाव 354/9 धावांवर चहापानाच्या आधी घोषित केला, न्यूझीलंडला सुमारे 136 षटकात जिंकण्यासाठी 425 धावांचे लक्ष्य दिले. दिवसाचा खेळ संपला तेव्हा डेव्हन कॉन्वे (Devon Conway) 60 धावांवर नाबाद आहे. यजमान संघाला कसोटी सामना वाचवण्यासाठी आता संपूर्ण पाचवा दिवस खेळण्याचे कठीण काम करायचे आहे. तर कसोटी सामना जिंकून कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरी साधण्यासाठी Proteas उत्सुक असतील.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)