ICC T20 विश्वचषक 2021 मधील गट 2 च्या सामन्यात आज न्यूझीलंडचा (New Zealand) सामना नामिबियाशी (Namibia) होत आहे. शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात ग्लेन फिलिप्स (Glenn Philips) आणि जिमी नीशम (James Neesham) यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने नामिबियासमोर विजयासाठी 164 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पहिले फलंदाजी करताना किवी संघाने चार गडी गमावून 163 धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभी केली. फिलिप्सने 21 चेंडूत नाबाद 39 तर नीशमने 23 चेंडूत नाबाद 35 धावा केल्या. नामिबियाकडून बर्नार्ड स्कोल्ट्झ, डेविड विसे आणि एरार्ड इरास्मस यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)