धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर रविवारी (22 ऑक्टोबर) आयसीसी विश्वचषक 2023 च्या 21व्या (ICC Cricket World Cup 2023) सामन्यात भारत आणि न्यूझीलंडचे (IND vs NZ) संघ आमनेसामने येतील. भारत आणि न्यूझीलंड हे संघ या विश्वचषकाचे आतापर्यंतचे सर्वोत्तम संघ आहेत आणि दोघांनी 4-4 सामने जिंकले आहेत. भारताने ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशचा पराभव केला आहे, तर न्यूझीलंड संघाने इंग्लंड, नेदरलँड, बांगलादेश आणि अफगाणिस्तानचा पराभव केला आहे. टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्माकडे आहे तर न्यूझीलंडचे नेतृत्व केन विल्यमसनकडे आहे, जरी विल्यमसन तंदुरुस्त नसताना टॉम लॅथमनेही काही सामन्यांमध्ये नेतृत्व केले आहे. दरम्यान, भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2.00 वाजता सुरु होइल. तुम्ही या सामन्याचे Disney + Hotstar वर लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता. तसेच स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर तुम्ही या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकता.
Dharamshala is all set for an epic battle, with #TeamIndia looking to redeem themselves against the Kiwis after their #CWC2019 loss. It's going to be one to watch! 😮
Tune-in to #INDvNZ in the #WorldCupOnStar,
Today, 12.30 PM onwards | Star Sports Network#CWC23 #Cricket pic.twitter.com/YbBamwVQA3
— Star Sports (@StarSportsIndia) October 22, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)