आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 चा 41 वा सामना न्यूझीलंड आणि श्रीलंका (NZ vs SL) यांच्यात बेंगळुरू येथे खेळला गेला. या रोमांचक सामन्यात न्यूझीलंड संघाने श्रीलंकेचा पाच गडी राखून पराभव करत उपांत्य फेरीतील आपले स्थान जवळपास पक्के केले आहे. तत्पूर्वी, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेला श्रीलंकेचा संपूर्ण संघ 46.4 षटकांत केवळ 171 धावांवरच मर्यादित राहिला. श्रीलंकेसाठी सलामीवीर कुसल परेराने सर्वाधिक 51 धावा केल्या. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने सर्वाधिक तीन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाने अवघ्या 23.2 षटकांत पाच गडी गमावून लक्ष्य गाठले. न्यूझीलंडकडून सलामीवीर डेव्हन कॉनवेने सर्वाधिक 45 धावा केल्या. श्रीलंकेकडून अँजेलो मॅथ्यूजने दोन बळी घेतले.
New Zealand cruise to victory against Sri Lanka and put one foot in the #CWC23 semi-finals!https://t.co/xEJ99EyR86 | #NZvSL | #CWC23 pic.twitter.com/bD1VqVt8Py
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) November 9, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)