IND vs NZ ODI Series 2023: भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात 18 ते 24 जानेवारी दरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी रविवारी रात्री न्यूझीलंडने संघ जाहीर केला आहे. त्याचबरोबर भारतापूर्वी किवी संघाला 10 ते 14 जानेवारी दरम्यान पाकिस्तानविरुद्ध तीन वनडे खेळायचे आहेत. या मालिकेसाठीही संघाची निवड करण्यात आली आहे. दोन्ही मालिकांमध्ये न्यूझीलंडचे कर्णधारपद वेगवेगळे खेळाडू दिसणार आहेत. होय, केन विल्यमसन (Kane Williamson) पाकिस्तान मालिकेत न्यूझीलंडचे नेतृत्व करेल पण तो भारताविरुद्धच्या मालिकेसाठी संघाचा भाग नाही आहे. भारताविरुद्धच्या वनडे मालिकेत टॉम लॅथम न्यूझीलंडचे नेतृत्व करणार आहे. एकदिवसीय सामन्यानंतर संघाला येथे तीन सामन्यांची टी-20 मालिकाही खेळायची आहे, ज्यासाठी अद्याप संघ जाहीर झालेला नाही. विल्यमसन टी-20 मध्ये खेळतो की टीम साऊदी संघाची धुरा सांभाळणार हे पाहावे लागेल.

न्यूझीलंडचा वनडे संघ

टॉम लॅथम (कर्णधार), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, जेकब डफी, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, अॅडम मिल्ने, डॅरिल मिशेल, हेन्री निकोल्स, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, ईश सोधी, एच. शिपले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)