कारकीर्दीत प्रथमच आयसीसी ट्रॉफी (ICC Trophy) जिंकल्यानंतर न्यूझीलंडच्या (New Zealand) टिम साउदीने (Tim Southee) आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) फायनल जर्सीचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. फायनलसाठी निवडलेल्या संपूर्ण संघाद्वारे जर्सीवर स्वाक्षरी करण्यात आली आहे आणि लिलावाद्वारे जमा केलेला सर्व निधी Beattie कुटुंबियांना जाईल. 7 वर्षांची मुलगी होली बीट्टी जुलै 2018 पासून कर्करोगाच्या न्यूरोब्लास्टोमाच्या दुर्मिळ आणि आक्रमक प्रकाराने ग्रस्त आहे. दोन वर्षांहून अधिक काळ उपचार करूनही होली अद्याप या आजारापासून मुक्त झाली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tim Southee (@tim_southee)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)