Nepal Announced Squad for T20 WC 2024: जूनपासून सुरू होणाऱ्या टी-20 विश्वचषक 2024 साठी (T20 World Cup 2024) बहुतांश संघांनी त्यांचे संघ जाहीर केले आहेत. नेपाळनेही बुधवारी संघ जाहीर केला. नेपाळ संघाचे कर्णधारपद रोहित पौडेलकडे (Rohit Paudel) असेल. ओमानमध्ये झालेल्या एसीसी प्रीमियर चषक सामन्यांमध्ये ज्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली होती त्यांचा नेपाळ संघात समावेश करण्यात आला आहे. हे खेळाडू कीर्तिपूरमध्ये वेस्ट इंडिज अ संघाविरुद्धही सामना खेळत आहेत. एका षटकात 6 षटकार मारण्याच्या विश्वविक्रमाची बरोबरी करणाऱ्या या खेळाडूचा नेपाळ संघात समावेश करण्यात आला आहे. अष्टपैलू दीपेंद्र सिंग ऐरीचा संघात समावेश करण्यात आला आहे. एरीने एप्रिलमध्ये कतारविरुद्ध एका षटकात सहा षटकार मारून विश्वविक्रमाची बरोबरी केली होती.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)