इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या (PL 2023) हंगामातील पहिला एलिमिनेटर सामना आज लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स (LSG vs MI) यांच्यात खेळला गेला. दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला गेला. एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सचा 81 धावांनी पराभव केला. या विजयासह मुंबई इंडियन्सने क्वालिफायर 2 मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. शुक्रवारी गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात क्वालिफायर 2 खेळला जाईल. तत्पूर्वी, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्सच्या संघाने निर्धारित 20 षटकांत आठ गडी गमावून 182 धावा केल्या. मुंबई इंडियन्स संघाकडून कॅमेरून ग्रीनने सर्वाधिक 44 धावा केल्या. लखनौ सुपर जायंट्सकडून नवीन-उल-हकने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौ सुपर जायंट्सचा संघ 16.3 षटकात केवळ 101 धावांवर गारद झाला. लखनौ सुपर जायंट्सकडून मार्कस स्टॉइनिसने सर्वाधिक 40 धावा केल्या. मुंबई इंडियन्सकडून आकाश मधवालने सर्वाधिक 5 बळी घेतले.
Look who's off to 📍Ahmedabad to meet the Gujarat Titans 😉
Congratulations to the 𝗠𝗨𝗠𝗕𝗔𝗜 𝗜𝗡𝗗𝗜𝗔𝗡𝗦 who make it to #Qualifier2 🥳#TATAIPL | #Eliminator | #LSGvMI | @mipaltan pic.twitter.com/9c1QobgnhU
— IndianPremierLeague (@IPL) May 24, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)