ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या टी-20 मालिकेत टीम इंडियाच्या संघाचा भाग असलेला वेगवान गोलंदाज मुकेश कुमार लग्न करणार आहे. त्यासाठी त्याने बीसीसीआयकडून सुटीही घेतली आहे. आता त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो आपल्या वधूसोबत जोरदार डान्स करत आहे. हा व्हिडिओ हळदी समारंभाचा आहे. मुकेश कुमार पहिल्या दोन सामन्यांमध्ये प्लेइंग-11 चा भाग होता, पण लग्नामुळे तो आपल्या घरी परतला आहे. मुकेश कुमार याच्या भावी पत्नीचे नाव दिव्या सिंह आहे. दोघांनी याच वर्षी एंगेजमेंट केली. आता दोघेही लग्न करणार आहेत. हळदी समारंभाच्या या व्हिडिओमध्ये मुकेश आणि दिव्या 'लॉलीपॉप लगेलू' या गाण्यावर जबरदस्त डान्स करत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (हेही वाचा: BCCI Files Insolvency Petition Against Byjus: बीसीसीआयचा मोठा निर्णय; बायजूस विरोधात दाखल केली दिवाळखोरी याचिका, जाणून घ्या प्रकरण)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)