आयपीएलच्या यंदाच्या हंगामाची सुरुवात 31 मार्चला सुरुवात होणार असून चैन्नई विरोधात गुजरात असा पहिला सामना होणार आहे. या सामान्यापुर्वी चैन्नई सुपर किंगचा (Chennai Super Kings) कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) एका वेगळ्या अंदाजात पहायला मिळाला. त्याच्या हातात बॅटच्या ऐवजी कलरची मशीन पहायला मिळाली. चैन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमच्या खुर्च्यांना रंग देताना माही दिसून आला. चैन्नईचे होम ग्राऊंड असलेले एमए चिंदबरम स्टेडियमवर आयपीलएलचा पहिला सामना 3 एप्रिलला खेळवला जाणार आहे.  कोविडनंतर पहिल्यांदाच या स्टेडिअमवर प्रेक्षक येणार असल्यामुळे कोणतीच कमी न ठेवण्यासाठी प्रशासन तयारी करत आहे. या तयारीची पाहणी करण्यासाठी माही स्वत: स्ट्रॅण्डमध्ये आला आणि तिथे असलेल्या खुर्च्यांना रंग देऊ लागला. चैन्नई सुपर किंगने हा व्हिडिओ आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरुन शेअर केला.

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)