T20 World Cup 2024: टी-20 क्रिकेट विश्वचषक जिंकून हैदराबादला परतलेल्या मोहम्मद सिराजचे (Mohammed Siraj) चाहत्यांनी जल्लोषात स्वागत केले. चाहत्यांचा जल्लोष आणि उत्साह पाहण्यासारखा होता. सिराजला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी विमानतळावर गर्दी केली होती. चाहत्यांनी सिराजचे जोरदार स्वागत केले, त्याच्यासोबत सेल्फी घेतले आणि त्याला शुभेच्छा दिल्या. सिराजच्या स्वागताचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. आजा त्याची विजय मिरवणुक निघाली आहे. दरम्यान, मोहम्मद सिराजनेही 'लेहरा दो' गाऊन चाहत्यांना मंत्रमुग्ध केले.

पाहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)